विशेष प्रतिनिधी
तिरुमला – तिरुमला येथे येत्या ७ ते १५ ऑक्टोबरदरम्यान वार्षिक ब्रह्मोत्सव होत आहे. मंगळवारी पारंपरिकरीत्या मंदिराची स्वच्छता करण्यात आली. येत्या गुरुवारपासून तिरुमला येथे ब्रह्मोत्सवास प्रारंभ होत आहे.Bramostav will began from tomorrow
दरवर्षी या महोत्सवासाठी जगभरातून लाखो भाविक तिरुपतीला भेट देतात. त्यानिमित्ताने मुख्य मंदिराचा गाभारा, परिसराची स्वच्छता करण्यात आली. तिरुमला मंदिराची वर्षातून चारवेळेस स्वच्छता केली जाते आणि ही स्वच्छता उगादी, अनिवारा अस्थानम, वार्षिक ब्रह्मोत्सव आणि वैंकुठ एकादशीच्या अगोदर केली जाते.
परिमलम नावाच्या वनौषधी असलेल्या मिश्रणाची फवारणी मुख्य मंदिराबरोबरच देवस्थान परिसरातील मंदिराचे छत, भिंत आणि खांबावर करण्यात आली. यावेळी मुख्य मंदिरातील मुख्य मूर्ती झाकली होती. मंदिराची साफसफाई आणि पूजेच्या भांडी स्वच्छ झाल्यानंतर मूर्तीवरील आच्छादन काढण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App