विशेष प्रतिनिधी
काठमांडू : एव्हरेस्टवर मोहीम सुरू केली, तेव्हा मी भयभीत झालो होतो. कारण मी कोठे आणि कसा जात आहे, हे काहीच समजत नव्हते. सतत मी अडखळत होतो. अनेक ठिकाणी पडलो देखील. आपल्याला दृष्टी आहे की नाही, आपले हात-पाय आहेत की नाही यावरुन काहीच अडत नाही. जर आपली इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर आपण हवे ते साध्य करू शकतो. जे की दुसरे साध्य करू शकत नाहीत. हे उद्गार आहेत चीनचे ४६ वर्षीय गिर्यारोहक झांग होंग यांचे. Blind Mousterian climbs evrest
आपल्या अफाट इच्छाशक्तीच्या जोरावरच होंग यांनी माउंट एव्हरेस्ट सर केले असून ते अंध आहेत. एव्हरेस्टरवर चढाई करणारे ते जगातील तिसरे तर आशियातील पहिले अंध गिर्यारोहक ठरले आहेत.
गेल्या २५ वर्षापासून त्यांना जग पाहता येत नव्हते. तरीही त्यांनी ८८४९ मीटर उंचीचे शिखर गाठले, हे विशेष. होंग यांनी दृष्टिहीन अमेरिकी गिर्यारोहक एरिक वेहेनमेयर यांच्यापासून प्रेरणा घेत माउंट एव्हरेस्ट वर चढाई करण्याचा निर्णय घेतला. वेहेनमेयर यांनी २००१ मध्ये माउंट एव्हरेस्टवर चढाई केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App