पियूष गोयलांकडे राज्यसभेचे नेतेपद; मोदींनी आपल्या पुढच्या पिढीतल्या नेत्याकडे सोपविली जबाबदारी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेचे नेतेपद सोपविले आहे. माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडे आधी राज्यसभेचे नेतेपद होते. कर्नाटक राज्यपालपदी नियुक्ती केल्यानंतर ही जागा रिक्त होती. BJP’s Piyush Goyal appointed as the Leader of House in the Rajya Sabha.

मोदींनी गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेकओवर केला. त्यामध्ये अनेक तरूण नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती दिली. त्याचबरोबर काल महत्त्वाच्या मंत्रिमंडळ समित्यांमध्ये बदल केले. आज त्याच्या पुढचे पाऊल टाकत पियूष गोयल यांची राज्यसभेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पियूष गोयल हे मोदींच्या पुढच्या पिढीतले नेते आहेत. सध्या त्यांचे वय 57 आहे. त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवून मोदींनी नव्या पिढीचा महत्त्वाच्या नेतेपदाचा मार्ग मोकळा करून दिल्याचे मानण्यात येते.

मंत्रिमंडळात पियूष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्रिपद आहे. तसेच खाद्य आणि आपूर्ती मंत्रालयाची जबाबदारी देखील आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योग मंत्रालयाचा प्रभार देखील देण्यात आला आहे.

१९ जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी त्यांच्या खांद्यावर सभागृह नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत असणार आहे. यात संसदीय राजकारणात पियुष गोयल यांना देण्यात आलेली ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. पियुष गोयल २०१० पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचे विरोधकांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.

मोदींच्या कार्यकाळातला राज्यसभा नेतेपदाचा हा तिसरा बदल आहे. पहिल्या मोदी सरकारमध्ये राज्यसभेचे सभागृह नेतेपद अरुण जेटली यांच्याकडे होते. त्यांचे निधन झाल्यानंतर ही जबाबदारी थावरचंद गहलोत यांच्याकडे आली. आता या पदावर पियूष गोयल यांची वर्णी लागली आहे.

BJP’s Piyush Goyal appointed as the Leader of House in the Rajya Sabha.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात