जॉन्सन भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची प्रतिमा बिघडविण्यासाठीच धार्मिक हिंसाचार, भाजपचा आरोप


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत भेटीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बिघडविण्यासाठी देशभरात धार्मिक हिंसक घटना हेतुपूर्वक घडविल्या जात आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार हंसराज हंस यांनी केला आहे. गेल्या एक महिन्यात दहा राज्यांत १८ ठिकाणी हिंसक घटना घडल्या.BJP’s allegations of religious violence to tarnish PM’s image in the wake of Johnson’s visit

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये या घटना घडल्या आहेत.दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी बुधवारी सकाळी एकाच वेळी नऊ बुलडोझरचा वापर करण्यात आला; परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली.त्यानंतर प्रदेश भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी म्हटले की, दंगेखोरांवर चालणारा बुलडोझर रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत.भाजप सरकारे बुलडोझरचा वापर फक्त अल्पसंख्याकांविरुद्ध करीत आहेत, असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. भाजपचे आदेश गुप्ता यांचा आरोप आहे की, जहांगीरपुरीतील हिंसाचारात रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात होता.

उत्तर प्रदेश निवडणुकीत बुलडोझरच्या यशस्वी उपयोगानंतर देशभरात आता त्याची नवी व्याख्या केली जात आहे. राज्यसभेतील भाजपचे सदस्य जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांनी बुधवारी बुलडोझरच्या चित्रासोबत केलेल्या ट्विटमध्ये जेसीबी म्हणजे जिहाद कंट्रोल बोर्ड, असे म्हटले आहे.

BJP’s allegations of religious violence to tarnish PM’s image in the wake of Johnson’s visit

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण