चंदीगडच्या महापौरपदी भाजप एक मताने विजयी, कॉँग्रेसची गोची झाल्याने आपला दिला नाही पाठिंबा


विशेष प्रतिनिधी

चंदीगड : चंदीगडच्या महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार सरबजीत कौर यांनी आम आदमी पार्टीच्या (आप) अंजू कात्याल यांच्या विरोधात केवळ एका मताने जिंकल्या. भाजप आणि आपच्या उमेदवारांना समान म्हणजे १४ मते मिळाली होती.BJP won by one vote as the mayor of Chandigarh

मात्र, नंतर आपचे एक मत अवैध घोषित झाल्याने भाजपचा विजय झाला. सात नगरसेवक असतानाही पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला पाठिंबा देण्यावरून कॉँग्रेसची गोची झाल्याने त्यांनी मतदान प्रक्रियेतून बाहेर राहणे पसंत केले.



निवडणुकीनंतर आपच्या उमेदवारांनी नवनिर्वाचित महापौरांच्यासमोर गोंधळ घातला. उपायुक्त विनय प्रताप यांनाही घेराव घातला. काँग्रेसने या निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले. त्यांच्यासोबत अकाली दलाचे एकमेव नगरसेवक हरदीप सिंगही सामील झाले.

भाजपचा पराभव करण्यासाठी आपला पाठिंबा द्यावा तर पंजाब निवडणुकीपूर्वी आपची स्थिती मजबूत झाली असती. भाजपला मतदान केले असते तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल, या कात्रीत कॉँग्रेस सापडली होती. चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत 35 पैकी 14 जागा जिंकल्यानंतर आप जोमात आहे. चंदीगडचे महापौरपद मिळाले असते तर आणखी जोम चढला असता.

भाजपच्या बाजूने 13 नगरसेवकांनी मतदान केले. एक मत खासदार किरण खेर यांनी दिले. कारण त्या महापालिका सभागृहाच्या पदसिद्ध सदस्य आहेत. एक खासदार महापौर निवडणुकीत मतदान करू शकत नाही असा कांगावा आपने केला. परंतु त्यांना सचिवांनी कायद्याची एक प्रत दिली होती. त्यामध्ये तरतूद होती एखादा खासदार सभागृहाचा पदसिद्ध सदस्य असेल तर तो किंवा ती मतदान करू शकते.

BJP won by one vote as the mayor of Chandigarh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात