विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने पाचही राज्यांत कॉँग्रेसचा दारुण पराभव करून सोनिया गांधी आणि राहूल गांधी या माता-पुत्रांना जबरदस्त धक्का दिला. दुसरे गांधी माता- पुत्र मनेका आणि वरुण गांधी यांनाही प्रचारातून भाजपला बाजुला ठेवले. तरीही मनेका गांधींच्या सुलतानपूर आणि वरुण गांधींच्या पिलिभित मतदारसंघात सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत.BJP wins by beating second Gandhi mother and son, wins all seats in Pilibhit, Sultanpur despite Maneka-Varun Gandhi were not in campaign
उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर आणि पिलीभीतमध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेनका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी यांचे बालेकिल्ले समजले जातात. मनेका यांचा संसदीय मतदारसंघ सुलतानपूर हा पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागलेला आहे –
इसौली, सुलतानपूर, सदर, लंबुआ आणि कादीपूर. येथे भाजपने सर्व 5 जागांवर विजय मिळविला आहे. पिलीभीत जेथे वरुण खासदार आहेत त्या बहेरी, पिलीभीत, बरखेरा, बिसलपूर आणि पुरणपूर येथे भाजपने विजय मिळविला आहे.
वरुण गांधी सातत्याने योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत होते. त्यामुळे भाजपने दोन्ही माता-पुत्रांना प्रचारातून बाजुला ठेवले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपने पिलीभीत विधानसभा मतदारसंघातील पाचही जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. सुलतानपूरमध्ये त्यांनी पाचपैकी चार मतदारसंघ जिंकले.
केवळ इसौलीला अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, यावेळी सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविला आहे.मनेका आणि वरुण या दोघांचाही पिलीभीतमध्ये मोठा मतदारसंख्या आहे. आई-मुलाच्या जोडीने अनुक्रमे 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येकी 5 लाख मतांच्या मोठ्या फरकाने जागा जिंकली. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हे दोघेही गायब होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App