विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली- केरळमध्ये कोरोना रूग्ण वाढू लागल्यानंतर यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केरळ सरकारने बकरी ईदच्या दिवशी कोरोना नियमांमध्ये दिलेली सूटच त्या राज्याला भोवली आहे, असे भाजपने म्हटले आहे.BJP targets kerala govt.
तर केंद्राकडून लसींबाबत हात आखडता घेतल्याने ठप्प पडलेले लसीकरण कोरोना रुग्णसंख्येतील वाढीला कारणीभूत असल्याचा पलटवार पी विजयन सरकारने केला आहे.भाजपने केरळमधील ताज्या रुग्ण वाढीसाठी बकरी ईदच्या दिवशी नियमांत दिलेली ढिलाई कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.
मार्क्सवादी सरकारने आपल्या लांगूलचालनाच्या राजकारणापुढे झुकून कोरोना नियमांकडे ईदच्या दिवशी दुर्लक्ष केले. नियमांचे व्यापक उल्लंघन झाले व कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, असे भाजपने म्हटले आहे.
राज्यातील कोरोना रूग्णसंख्या पुन्हा भयानक वेगाने वाढत असल्याने धास्तावलेल्या केरळ सरकारने पुन्हा एकदा २०२० प्रमाणे कडक लॉकडाउन लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारने केरळमधील कोरोना परिस्थिती गंभीर बनल्याच्या पार्श्वभूमीवर एनसीडीसीच्या संचालकांच्या नेतृत्वाखाली ६ तज्ज्ञांचे पथक त्या राज्यात पुन्हा पाठविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App