By Polls : भाजपने 3 लोकसभा आणि 16 विधानसभा जागांवर केली उमेदवारांची घोषणा, 30 ऑक्टोबरला निवडणुका


केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील तीन लोकसभा जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच भाजपने विविध राज्यांतील 16 विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. या जागांवर 30 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. bjp released its list of candidates for by polls to 3 lok sabha seats and 16 assembly seats


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील तीन लोकसभा जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच भाजपने विविध राज्यांतील 16 विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. या जागांवर 30 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे.

लोकसभेच्या तीन जागांसाठी उमेदवार कोण?

भाजपने महेश गावित यांना दादरा आणि नगर हवेलीतून, ज्ञानेश्वर पाटील यांना मध्य प्रदेशातील खंडवा आणि हिमाचल प्रदेशातील मंडीमधून ब्रिगेडियर खुशाल ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.

16 विधानसभा जागांवरील भाजपचे उमेदवार

  • आंध्र प्रदेश, बाडवेल- पुन्थाला सुरेश
  • हरियाणा, ऐलानाबाद- गोविंद कांडा
  • हिमाचल प्रदेश, फतेहपुर- बलदेव ठाकुर
  • हिमाचल प्रदेश, आर्की- रतन सिंह पाल
  • हिमाचल प्रदेश, जुब्बल खोटखे- नीलम सरायक
  • कर्नाटक, सिंदगी- रमेश भुसानेरू
  • कर्नाटक, हंगल- शिवाराज सज्जनार
  • मध्य प्रदेश, पृथ्वीपुर- शिशुपाल सिंह यादव
  • मध्य प्रदेश, रायगांव- प्रतिमा बागरी
  • मध्य प्रदेश, जॉबट- सुलोचना रावत
  • राजस्थान, वल्लभनगर- हिम्मत सिंह झाला
  • राजस्थान, धरियावाड़- खेत सिंह मीना
  • पश्चिम बंगाल, दिनहाता- अशोक मंडल
  • पश्चिम बंगाल, शांतिपुर- निरंजन बिस्वास
  • पश्चिम बंगाल, खरदाहा- जॉय साह
  • पश्चिम बंगाल- गोसाबा- पालाश राणा

देशातील तीन लोकसभा आणि 30 विधानसभा जागांसाठी 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ज्या राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा रिक्त आहेत त्यामध्ये दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, मध्य प्रदेश- खंडवा आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा यांचा समावेश आहे. यासह 14 राज्यांमधील 30 वेगवेगळ्या विधानसभा जागांवरही निवडणुका होणार आहेत.

कोणत्या राज्यांत विधानसभा निवडणुका

आंध्र प्रदेश – १, आसाम – ५, बिहार – ६, हरियाणा – १, हिमाचल प्रदेश – ३, कर्नाटक – २, मध्य प्रदेश – ३, महाराष्ट्र – १, मेघालय – ३, मिझोराम – १, नागालँड – १, राजस्थान – २, तेलंगणा – १, पश्चिम बंगाल – ४ जागांवर निवडणुका होऊ घातल्या आहेत.

bjp released its list of candidates for by polls to 3 lok sabha seats and 16 assembly seats

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात