राज ठाकरेंच्या माफीसाठी भाजपचे खासदार आक्रमक, उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नसल्याचा पुन्हा इशारा


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारांची खरडपट्टी काढली असे मनसेकडून सांगितले जात असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा तीव्र विरोध कायम आहे. त्यांनी गोंडामध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध दर्शवित रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आणखी अपमान सहन करणार नसून राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी. अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नसल्याचे बृजभूषण सिंह यांनी सांगितले. BJP MPs aggressive for Raj Thackeray’s apology


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारांची खरडपट्टी काढली असे मनसेकडून सांगितले जात असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा तीव्र विरोध कायम आहे.

त्यांनी गोंडामध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध दर्शवित रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आणखी अपमान सहन करणार नसून राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी. अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नसल्याचे बृजभूषण सिंह यांनी सांगितले.



 

गोंडा येथे बृजभूषण सिंह यांनी मोठी रॅली काढली. उत्तर प्रदेशातील नागरिकांनीही राज ठाकरेंचा विरोध करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की मी सर्वप्रथम उत्तर भारतीय आहे. राज ठाकरेंना हिशोब द्यावा लागेल. २००८ पासून त्यांनी उत्तर भारतीयांना त्रास दिला आहे. मजुर तसेच परीक्षा देणाऱ्या  विद्यार्थ्यांना त्यांनी मारहाण केली. यूपीमध्ये यायचे आहे, तर माफी मागावीच लागेल, असे बृजभूषण सिंह म्हणाले. आपल्याला मराठ्यांचे समर्थन प्राप्त असून, मी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो.

BJP MPs aggressive for Raj Thackeray’s apology

 

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”