राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या खासदाराचा विरोध, म्हणाले आधी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागा

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा अवमान केला आहे. अयोध्येत येण्यापूर्वी त्यांनी हात जोडून त्यांची माफी मागावी. अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे.BJP MP opposes Raj Thackeray’s visit to Ayodhya, says first bow hands with North Indians and apologize


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा अवमान केला आहे. अयोध्येत येण्यापूर्वी त्यांनी हात जोडून त्यांची माफी मागावी. अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे.

बृजभूषण सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांची भेट न घेण्याचा सल्ला दिला आहे. ठाकरे कुटूंबाचा राम मंदिर आंदोलनाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्येत प्रभु रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. कैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी एका ट्विटद्वारे त्यांच्या या दौऱ्या वर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले उत्तर भारतीयांचा अवमान करणाऱ्या राज ठाकरेंना आम्ही अयोध्येच्या सीमेत घुसू देणार नाही. अयोध्येत येण्यापूर्वी त्यांनी प्रथम उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी.

राज ठाकरे जोपर्यंत जाहीरपणे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊ नये. राम मंदिर आंदोलनात केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व सर्वसामान्यांची भूमिका आहे. ठाकरे कुटूंबाचे याच्याशी कोणतेही देणेघेणे नाही, असे सांगून बृजभूषण सिंह म्हणाले, आम्ही 2008 पासून पाहत आहोत, त्यांनी ‘मराठी माणूस’ हा मुद्दा समोर आणला, मुंबईच्या विकासात 80% योगदान हे त्या शहरातील नसलेल्या लोकांचे आहे. त्यांनी आपली चूक सुधारावी. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा मी त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे की, त्यांनी माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटूही नका.

BJP MP opposes Raj Thackeray’s visit to Ayodhya, says first bow hands with North Indians and apologize

महत्वाच्या बातम्या