विशेष प्रतिनिधी
कोलकता – पश्चि म बंगालमध्ये राजकीय हिंसाचार अजूनही सुरूच आहे. आता उत्तर दिनाजपूरच्या जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते मिथुन घोष यांची गोळी झाडून हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. राजग्राम येथील त्यांच्या घराबाहेरच हल्लेखोरांनी रात्री अकराच्या सुमारास गोळ्या झाडल्या.BJP leader shot dead in West Bengal
इटाहार विधानसभा मतदारसंघातील राजग्रामचे रहिवासी असलेले मिथुन घोष हे जिल्हा भाजपच्या युवक संघटनेचे सचिव होते. ते घराबाहेर उभे असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. पोटात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाजपचे उत्तर दिनाजपूर जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव सरकार म्हणाले की, त्यांना अनेकदा फोनवरून धमक्या आल्या होत्या. यासंदर्भात आम्ही तक्रारही केला होती. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
सरकार म्हणाले, आम्हाला ११.३० च्या सुमारास मिथुन घोष यांची हत्या झाल्याचे समजले. ते घरात असताना बाहेरून कोणीतरी त्यांना हाक मारली. तेव्हा घराबाहेर आले असता हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. तृणमूल कॉँग्रेसच्या लोकांनीच हत्या घडवून आणल्याचा आरोप सरकार यांनी केला आहे.दरम्यान, इटाहारचे तृणमूलचे आमदार मुशर्रफ हुसेन यांनी या घटनेशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App