मेंदूचा शोध व बोध : मन आणि शरीर एकमेकांपासून वेगळे असतात हा समज चुकीचा


मन आणि शरीर एकमेकांपासून वेगळे असतात हा समज चुकीचा आहे. एकमेकांवर अवलंबून अवयवांचे काम होत असते. त्यातून मेंदूची भूमिका सर्वात महत्त्वाची. प्रत्येक अवयव मेंदूशी जोडलेला असते. श्वास, हृदयाचे ठोके, आतडीची हालचाल या आपल्या अजाणता होत असलेल्या क्रियाही मेंदूच्या देखरेखीत केल्या जातात. त्यामुळे मनाचे म्हणजेच मेंदूचे आजार झाले तर त्याची काही शारीरिक लक्षणे दिसतातच. काही व्यक्तींचे लक्ष आपल्या शरीराच्या अडचणीकडे जास्त वेधले जाते. त्यामुळे ही परिस्थिती मुळात त्या अवयवाच्या आजाराची आहे, असा निष्कर्ष निघतो.The notion that mind and body are separate from each other is wrong

मानसिक असामंजस्य आणि शारीरिक त्रास साधारण एकाच वेळेला सुरू होतात, त्यामुळे शारीरिक आजाराचा ताण आहे, असे वाटते. दुसरे म्हणजे मनाचा त्रास सांगायला लाज आणि कमीपणा वाटतो, त्यामुळे शरीराचे त्रास आधी सांगण्याकडे कल असतो. त्यानंतर तपासण्या आणि उपचार यातून काही निष्पन्न होत नाही. मात्र मानसिक त्रासाची शक्यता सुचवली तर व्यक्तीला पटत नाही. यामुळे त्यांना वारंवार डॉक्टर बदलावे लागतात.

याबाबत कोणती लक्षणे असू शकतात? खऱे पहायला गेल्यास व्यक्तिगणिक लक्षणे बदलतात. काही व्यक्तींना पचनक्रियेबद्दल जास्त त्रास होतो. तसेच हृदयरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, श्वासाचे त्रास आणि इतर सर्व प्रकारची लक्षणे येऊ शकतात. काही व्यक्तींचे अंग दुखते आणि थकवा वाटतो. एखाद्या अवयवाचा आजार नाही असे तपासणीतून समजल्यावर थोडे दिवस रुग्णाला बरे वाटते. नंतर दुसऱ्या अवयवाचे त्रास सुरू होतात. आजाराची भीती आणि आजाराचा भ्रम हे आणखी दोन प्रकार आहेत.

कुठलातरी गंभीर अथवा नुकताच प्रसिद्ध झालेला आजार आपल्याला झाला आहे, अशी भीती मनात बसते. त्याच्या तापासण्या केल्या जातात आणि तपासण्यात काही मिळाले नाही तरीही भीती राहते. अशा वेळी शातंपणे विचार करून मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. यात कोणताही संकोच करून नये. कारण मेंदूबाबत आता इतके संशोधन झाले आहे की योग्या उपचारांनी सर्व त्रास बरे होवू शकतात.

The notion that mind and body are separate from each other is wrong

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात