विशेष प्रतिनिधी
जम्मू काश्मीर: पाकिस्तानच्या संघाने भारतावर टी-२० विश्वचषक सामन्यामध्ये विजय मिळवला. इंडिया टुडे वृत्तानुसार या विजयानंतर काश्मिरच्या अनेक भागांमध्ये हा विजय साजरा केला गेला होता. या घटनेवरून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विक्रम रंधावा यांनी मुस्लिमांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. वकील मुजफ्फर अली शाह यांच्या तक्रारीवरून बहु फोर्ट पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला गेला आहे. ही टिप्पणी जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखवण्याचा हेतूने केली असल्याचे सांगून गुन्हा दाखल केला गेला आहे.
BJP leader charged for making hate speech against Muslims
फरार झाकीर नाईकने पुन्हा ओकली गरळ, जन्मलेले प्रत्येक मूल मुस्लिम असल्याचे विधान
विक्रम रंधावा यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जम्मू काश्मीर भाजपाने देखील विक्रम रंधावा यांना नोटीस बजावली आहे. “रंधावा यांनी केलेले वक्तव्य हे भाजपा मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध असून भाजपा सर्व धर्मांचा आदर करते. हा व्हिडिओ निदर्शनास आल्यानंतर भाजपकडून लगेचच रंधावा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली. रंधावा यांनी व्हिडिओमधील वापरलेली भाषा सहन केली जाणार नाही”. असे भाजपचे रवींदर रैना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App