पश्चिम बंगालमध्ये भाजपला तृणमुलचा आणखी एक धक्का

विशेष प्रतिनिधी

कोलकता : प. बंगालमध्ये अलीपुरद्वारचे भाजपचे जिल्हाध्यक्ष गंगा प्रसाद शर्मा यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक नेते तृणमूलमध्येही सामील झाले. BJP dist. President quits party

या प्रसंगी मुकुल रॉय म्हणाले, की भाजपने २०१९ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्तर बंगालमधूनच सर्वाधिक जागा जिंकल्या. अशावेळी या नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची केलेली तयारी म्हणजे भाजपचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.



गंगाप्रसाद शर्मा हे २०१५ पासून भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते. भाजपने अलीपुरद्वार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. विधानसभेला भाजपने पाच जागा जिंकल्या. परंतु शर्मा यांनी भाजपची साथ सोडल्याने धक्का बसला आहे. यात मुकुल रॉय यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानली जात आहे. मुकुल रॉय यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा टीएमसीचे अनेक नेते देखील भाजपमध्ये दाखल झाले होते. आता ते तृणमुलमध्ये परतल्याने हीच मंडळी परत घरवापसी करतील, असा अंदाज बांधला जात आहे.

BJP dist. President quits party

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात