राष्ट्रवादी कार्यालय उदघाटनाला गर्दी, बारमध्ये कितीही लोक चालतात ; मग अधिवेशन दोनच दिवसच का ? ; देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर भडकले

वृत्तसंस्था

मुंबई : दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उदघाटनाला झालेली गर्दी चालते. बारमध्ये कितीही लोक चालतात. मग अधिवेशन दोनच दिवस का ? असा सवाल करून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. Crowds at the NCP office opening, no matter how many people walk into the bar; So why only two days of convention? ; Devendra Fadnavis attacked the Thackeray government

राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मोठ्या कालावधीचं अधिवेशन घेण्याची मागणी विरोधकांकडून सुरु होती. मात्र, मंगळवारी झालेल्या बैठकीत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसात उरकण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संताप अनावर झाला. “एकीकडे हजारोंच्या उपस्थितीत कार्यालयाचं उदघाटन होते. दुसरीकडे बारमध्ये कितीही लोक गेले तरी चालतात. पण, विधिमंडळामध्ये कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचं नाही,” असा मु्द्दा उपस्थित करत फडणवीस ठाकरे सरकारवर चांगलेच भडकले.“महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी अवस्था यापूर्वी आम्ही संसदीय लोकशाहीमध्ये बघितलेली नाही. आज महाराष्ट्रासमोर प्रचंड प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. शेतकऱ्यांना विमा नाही. पण याबद्दल चर्चा करण्यासाठी विधिमंडळाला वेळ नाही. विद्यार्थी तणावात चालले आहेत, पण सरकारला चर्चा करण्यासाठी वेळ नाही. ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेण्याचं तर सोडा, पण आहे त्या अधिवेशनात चर्चा टाळण्याचा प्रयत्न दिसतोय. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का?,” असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे. अनिर्बंध झालेलं प्रशासन आणि मदमस्त झालेले मंत्री, याच्या भरवशावर हे महाराष्ट्र चालवणार आणि आम्ही प्रश्नही विचारायचे नाहीत. या दोन दिवसांच्या अधिवेशनाचा आम्ही निषेध करतो. बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात सरकारला अधिवेशनात जाब विचारू. आम्ही शांत बसू शकत नाही. लोकशाही मूल्यांची पायमल्ली आणि लोकशाहीची मुस्कटदाबी होत असेल, तर जनतेचा आवाज आम्हाला बनावंच लागेल. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आणि मराठा समाजाचं आरक्षण गेलं. पण, या सरकारचे मंत्री स्वतः मोर्चे काढत आहे. ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, ते मोर्चे काढत आहेत आणि कोर्टात बाजू मांडत नाहीत. त्यामुळे सरकार आहे की तमाशा, अशी परिस्थिती जनतेला बघायला मिळत आहे,” असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

Crowds at the NCP office opening, no matter how many people walk into the bar; So why only two days of convention? ; Devendra Fadnavis attacked the Thackeray government

महत्त्वाच्या बातम्या