BJP Candidates List : देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज भाजपने 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरातून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिरथू येथून निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत भाजपने सुमारे १७० जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली होती. BJP Candidates List: BJP announces first list of candidates for UP elections, CM Yogi to contest from Gorakhpur, 63 existing MLAs get another chance
वृत्तसंस्था
लखनऊ : देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज भाजपने 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरातून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिरथू येथून निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत भाजपने सुमारे १७० जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली होती.
भाजपने पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 57 जागांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यात 55 पैकी 48 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत 63 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट मिळाले आहे. तर 21 नवीन उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे.
मुख्यमंत्री योगी- गोरखपूर शहर केशव प्रसाद मौर्य – सिरथू (प्रयागराज) मथुरा- श्रीकांत शर्मा नोएडा- पंकज सिंग हस्तिनापूर- दिनेश खाटीक मेरठ – कमलदत्त शर्मा सरधना – संगीत सोम मेरठ दक्षिण – सोमेंद्र तोमर हापूड – विजय पाल गढ – हरेंद्र चौधरी
यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, योगीजींच्या सरकारने गेल्या ५ वर्षात गुंडाराज, भ्रष्ट, माफिया यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. मुली रात्रीही निर्भयपणे फिरू शकतात. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की योगीजींनी यूपीला दंगलमुक्त राज्य बनवले आहे. आज यूपीमध्ये मेडिकल कॉलेज सुरू होत आहेत, एक्सप्रेस वे बनवले जात आहेत. ज्या यूपीला एकेकाळी बिमारू राज्य म्हणून ओळखले जात होते, तीच यूपी आज देशात विकासाच्या रूपात नंबर-1 म्हणून पुढे आली आहे.
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति की बैठक में उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव-2022 के लिए निम्नलिखित प्रत्याशियों के नामों पर अपनी स्वीकृति दी गई है। (2/2) pic.twitter.com/0ZV4gxvNRl — BJP (@BJP4India) January 15, 2022
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति की बैठक में उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव-2022 के लिए निम्नलिखित प्रत्याशियों के नामों पर अपनी स्वीकृति दी गई है। (2/2) pic.twitter.com/0ZV4gxvNRl
— BJP (@BJP4India) January 15, 2022
स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान, धरमसिंग सैनी यांच्यासह योगी सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या समर्थकांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्ष बॅकफूटवर आला आहे.
10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 आणि 3 आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय रॅली आणि रोड शोला परवानगी दिलेली नाही.
BJP Candidates List: BJP announces first list of candidates for UP elections, CM Yogi to contest from Gorakhpur, 63 existing MLAs get another chance
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App