बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत घातपात किंवा तांत्रिक चूक नव्हती; तपासातला प्राथमिक निष्कर्ष


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण दलाचे पहिले प्रमुख सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत तामिळनाडूत निधन झाले. या अपघाताची दुर्घटनेची चौकशी आणि तपास सध्या संरक्षण दलांचे संयुक्त पथक करत आहे. या पथकाने हेलिकॉप्टरचा व्हॉइस डेटा रेकॉर्डर तसेच अन्य तांत्रिक बाबी तपासल्या तेव्हा त्यामध्ये कोणताही घातपात अथवा तांत्रिक चूक नव्हती, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.Bipin Rawat’s helicopter crashes

संबंधित दुर्घटना ही धुक्यामुळे झाली असावी यामागे घातपात नव्हता तर तो अपघातच होता, अशा स्वरूपाचा प्राथमिक निष्कर्ष संरक्षण दलांच्या संयुक्त पथकाने काढला आहे. अर्थात हा प्राथमिक निष्कर्ष असून यासंदर्भात आणखी चौकशी करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.



जनरल बिपिन रावत यांच्या समवेत त्यांच्या पत्नी मधुलिका तसेच भारतीय लष्कराचे सोळा वरिष्ठ अधिकारी देखील या एमआय 17 या अत्याधुनिक हेलिकॉप्टरमध्ये होते. या सर्वांचे या दुर्घटनेत निधन झाले आहे. या दुर्घटनेविषयी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याविषयीचा सखोल तपास सध्या संरक्षण दलाचे संयुक्त पथक करत आहे. प्राथमिक तपासानुसार यामध्ये कोणताही घातपात आढळला नसल्याचा निष्कर्ष पथकाने काढला आहे. त्याचबरोबर व्हाॅईस डेटा रेकॉर्डर तपासल्यानंतर त्यामध्ये तांत्रिक चूकही नव्हती किंवा हलगर्जीपणा नव्हता, असेही प्राथमिक निरीक्षण पथकाने नोंदविले आहे.

Bipin Rawat’s helicopter crashes

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात