कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत चर्चेविना संमत; विरोधकांचा प्रचंड गोंधळ


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत संमत झालेले तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच सांगितल्याप्रमाणे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच हे कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मांडले. त्यावेळीही विरोधकांनी जोरदार विरोध करत गोंधळ घातला. अखेर हे तीनही कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत आवाजी मताने संमत करण्यात आले. Bill to repeal agricultural laws passed without discussion in Lok Sabha; Huge confusion of opponentsकृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणणारे तीन कृषी कायदे जेव्हा संसदेत मांडले होते, तेव्हाही विरोधकांही कायद्याला विरोध करत गोंधळ घातला होता. त्यानंतर हे कायदे आवाजी मताने मंजूर झाले होते. त्यानंतर किसान युनियन या शेतकरी संघटनेने या कायद्याला विरोध केला. त्यासाठी दिल्लीच्या सीमेवर २ वर्षे आंदोलन सुरु केले. या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन देशविरोधी घटक भारतात अशांतता निर्माण करण्याचा कट रुचणार होते. देशाच्या सुरक्षेच्या कारणावरून पंतप्रधान मोदी यांनी हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विधेयक संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडले, मात्र त्यालाही विरोधकांनी विरोध केला.

सर्व विरोधकांना यावरही चर्चा करून सरकारवर टीका करण्याची संधी हवी होती, मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या मागणीनुसार कृषी कायदे रद्द केले जात आहेत, आता त्यावरही काय चर्चा करायची आहे, असा सवाल करत कायदे रद्द करत असल्याचे विधेयक आवाजी मताने संमत केले.

Bill to repeal agricultural laws passed without discussion in Lok Sabha; Huge confusion of opponents

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण