आतापर्यंत ३ एफआयआर नोंदवण्यात आले असून, एकूण ४४ जणांना अटक करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या राज्यात वाळू माफियांची मुजोरी वाढल्याचे दिसत आहे. पाटण्यातील वाळू माफियांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. माफियांनी आजवर अनेकवेळा खाण खाते आणि पोलिसांच्या पथकावर हल्ले केले आहेत, पण यावेळी त्यांनी असे काही केले की ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. पाटणा-बिहटा महामार्गावर वाळू माफियांनी खाण खात्याच्या महिला निरीक्षकावर दगडफेक केली, बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांना फरपटत नेले. या प्रकारामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नितीश कुमार सरकारवर टीका केली जात आहे. Bihar Woman officer from mining department dragged attacked by people allegedly involved in illegal sand mining in Patna district
वाळू माफियांनी खनिकर्म विभागाच्या पथकावर दगडफेक केली. या घटनेची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये खाण खात्याच्या पथकावर काही हल्लेखोरांनी दगडफेक केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. खाण खात्याची टीम धावू लागते, त्याचवेळी एका बदमाशाने त्या महिला निरीक्षकाला पकडून ओढले आणि बेदम मारहाण केली. यामध्ये महिला निरीक्षकासह खाण खात्याचे काही कर्मचारी जखमी झाले आहेत.
४४ जणांना करण्यात आली अटक –
खाण खात्याच्या पथकावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाटणा सिटी एसपी राजेश कुमार टीमचे नेतृत्व करत होते. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून या प्रकरणात सहभागी असलेल्या ४४ जणांना अटक केली.
अवैध वाळू उत्खननाविरोधात मोहीम राबवणाऱ्या खनिकर्म विभागाच्या पथकावर हल्ला झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये एक महिला निरीक्षक आणि काही कर्मचारी जखमी झाले. पाटणा एसएसपीच्या निर्देशानुसार या प्रकरणी आतापर्यंत ३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत आणि एकूण ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. काही संशयितांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना पकडण्यासाठी सातत्याने छापेमारी सुरू आहे. याशिवाय व्हिडिओच्या आधारेही त्यांची ओळख पटवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App