विशेष प्रतिनिधी
पाटणा : गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा असे म्हणत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूबंदी निर्णयावर ठाम असल्याचे म्हंटले आहे. काही लोकांची गडबड करण्याची प्रवृत्तीच असते. अशा लोकांना शिक्षा दिली जाईल,असा इशारा त्यांनी दिला आहे.Bihar Chief Minister Nitish Kumar is adamant on the decision to ban alcohol
ऐन दिवाळीत विषारी दारू पिल्याने बिहारमध्ये ३१ जणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधकांकडून नितीश सरकारच्या ‘दारुबंदी’च्या निर्णयाची खिल्ली उडवली जाऊ लागली आहे. या घटनेला नितीश कुमार यांचे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
मात्र नितीश कुमार यांनी आरोप फेटाळत आपण दारूबंदीवर ठाम असल्याचे म्हंटले आहे. मात्र ‘गडबड चीज पीएंगे तो यही होगा’ असे सांगत नितीश कुमार म्हणाले, दारुबंदी केल्यानंतरही काही जण दारुचं प्राशन करतात. २०१६ पासून आम्ही दारुबंदी सक्तीनं लागू केली आहे. अधिकाधिक लोकांचा कल दारुबंदीच्या बाजुनं आहे.
पण जे लोक अजूनही दारु पित असतील त्यांना आवाहन आहे की त्यांनी दारु पिणं सोडून द्यावं. काहीतरी गडबड होणारच. काही लोकांची गडबड करण्याची प्रवृत्तीच असते. अशा लोकांना शिक्षा दिली जाईल. लोकांना आग्रह करू इच्छितो की अशा लोकांपासून लांब राहा. दारुबंदीवरून काही लोक माझ्याविरोधात बोलतात परंतु, माझ्यासाठी हा चिंतेचा विषय नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App