विशेष प्रतिनिधी
मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे आपल्या कुटुंबीयांसह भारतातच राहणार आहेत. ते लंडनला स्थाईक होणार अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दाखवल्या होत्या. लंडनमध्ये त्यांनी घर घेतल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र यावर रिलायन्सने स्पष्टीकरण दिलं आहे. एक पत्रक रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे काढण्यात आले आहे.Rumors that Mukesh Ambani will settle in London are wrong
सोशल मीडिया आणि काही वृत्तपत्रांनी एक बातमी दिली होती. ती बातमी अशी होती की लंडन येथील स्टोक पार्कमध्ये मुकेश अंबानी यांनी घर घेतलं आहे आणि ते कुटुंबासह तिथे स्थायिक होणार आहेत. मात्र हे वृत्त पूर्णतः चुकीचं आणि निराधार आहे. आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे स्पष्टीकरण देत आहोत की आमचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय लंडन किंवा जगात कुठेही शिफ्ट होणार नाहीत.
RIL समूहाची उपकंपनी RIIHL जिने अलीकडेच स्टोक पार्क मालमत्ता खरेदी केलीय. ती मालमत्ता वारसा ठिकाण असून, त्या जागेवर एक प्रमुख गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट उभारण्याचा आमचा उद्देश आहे. तसेच नियोजन मार्गदर्शक तत्त्वे आणि स्थानिक नियमांचे पूर्णपणे पालन करूनच आम्ही ते विकसित करणार आहोत.
यामुळे समूहाच्या वेगाने वाढणाऱ्या ग्राहक व्यवसायात भर पडेल. त्याच बरोबर ते भारताच्या प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार करेल, असंही निवेदनात रिलायन्सनं म्हटलंय.
मिड डे’ या इंग्रजी दैनिकानं यासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्यात स्टोक पार्क हा एखाद्या राजप्रासादाप्रमाणे असून, त्यामध्ये 49 बेडरुम्स असल्याचं सांगितलंय. सध्या याठिकाणी अंबानी कुटुंबीयांच्या गरजेप्रमाणे सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुकेश अंबानी आपल्या कुटुंबीयांसह या ठिकाणी राहायला जातील, असेही बातमीत म्हटलेय.
यापूर्वी लॉकडाऊनच्या काळातही अंबानी कुटुंबीय रिलायन्सचा तेलशुद्धीकरण प्रकल्प असलेल्या जामनगर येथे जाऊन राहिले होते. मात्र भारतातून ते लंडनला शिफ्ट होणार नाहीत तसंच जगात कुठेही शिफ्ट होणार नाहीत असं पत्रक आता रिलायन्सने काढलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App