वृत्तसंस्था
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपुर मध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला. नितीश कुमार पुतळ्याला हार घालण्यासाठी चौथऱ्यावर चढले असतानाच एक युवक वेगाने मागून आला आणि मुख्यमंत्री पाठमोरे उभे असतानाच त्यांना फटका मारला…!!Nitish Kumar: Bihar Chief Minister Nitish Kumar beaten up in Bakhtiyarpur; Youth in police custody
पण मुख्यमंत्र्यांवर मागून अचानक हल्ला करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी लगेच पकडले आहे. या युवकाने नितीश कुमार यांना कानाखाली मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. बिहार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारा व्यक्ती हा मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. मात्र, नितीश कुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
Bihar | A youth tried to attack CM Nitish Kumar during a program in Bakhtiarpur. The accused was later detained by the Police. (Viral video) pic.twitter.com/FoTMR3Xq8o — ANI (@ANI) March 27, 2022
Bihar | A youth tried to attack CM Nitish Kumar during a program in Bakhtiarpur. The accused was later detained by the Police.
(Viral video) pic.twitter.com/FoTMR3Xq8o
— ANI (@ANI) March 27, 2022
नितीश कुमार सुखरुप
पाटणा मधील बख्तियारपूरमध्ये नितीश कुमार यांच्यावर एका युकवाने हल्ला केला. त्याने नितीश कुमार यांना बुक्की मारली आहे. यामध्ये नितीश कुमार हे जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. नितीश कुमार एका कार्यक्रमानिमित्त बख्तियारपूरमध्ये गेले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App