पडळकरांचा गनिमी कावा : पवारांच्या घराणेशाहीला विरोध करत सांगलीत अहिल्यादेवी स्मारकाचे मेंढपाळाच्या हस्ते उद्घाटन!!


प्रतिनिधी

मुंबई : सांगलीच्या अहिल्याबाई होळकर समर्थाचे सामान्य मेंढपाळाच्या हस्ते उद्घाटन करून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीला आणि शरद पवारांच्या राजकीय घराणेशाहीला तिसऱ्यांदा आव्हान देऊन ते यशस्वी करून दाखवलं…!!Padalkar’s guerrilla warfare: Inauguration of Ahilya Devi memorial in Sangli by shepherds opposing Pawar’s dynasty

आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमी शरद पवारांच्या राजकीय घराणेशाहीला टार्गेट करतात. आजही पुन्हा तेच दिसून आले. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण शरद पवारांच्या हस्ते करण्यास विरोध केला. आणि अखेर सामान्य मेंढपाळांच्या हस्ते आजच पुतळ्याचे उद्घाटन करून दाखवले.गोपीचंद पडळकर हजारो कार्यकर्त्यासह रस्त्यावर उतरले. काही वेळातच त्यांना सदाभाऊ खोत यांची साथ मिळाली. कारण पिवळा शर्ट पिवळी टोपी घातून सदाभाऊही खांद्याला खांदा लावत मैदानात उतरले. आणि या जोडगोळीने पुतळ्याचं उद्घाटन आजच करणार असा इशारा सरकारला दिला. आणि तो खराही करून दाखवला. आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही गनिमी काव्याचा वापर करत सरकारला हतबल केले आहे.

पहिल्यांदा जेजुरीतल्या पुतळ्याचे उद्घाटन

गेल्या वेळीही असाच अहिल्या देवींच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद पेटला होता. जेजुरीतल्या पुतळ्याचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते नको, म्हणत पडळकर आक्रमक झाले होते.घ मात्र पोलिसांनी त्यांची अडवणूक केली. मात्र पडळकरांनी हार न मानता भल्या पहाटे पोलीस बेसावध असताना अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे लोकार्पण पवारांच्या आधी करून दाखवले. हे एकदाच घडलं नाही तर हे पडळकरांनी तीनदा करून दाखवले आहे.

बैलगाडा शर्यत घेऊन दाखवली

बैलगाडा शर्यतीवरील बंदी अजून उठली नव्हती. त्यावेळी आम्हाला बैलगाडा शर्यत भरवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पडळकरांनी केली आणि शर्यतीचे आयोजन केले. मात्र सरकारने परवानगी नाकरली आणि बैलगाड्याचे ट्रॅकही खड्डे पाडून टाकले. मात्र तेव्हाही पडळकारांनी हार नाही मानली. पडळकरांनी ठरललेल्या दिवशीच पोलीस माळरानावर पाहरा देत असतानाही पाहटे दुसऱ्याच माळरानावर शर्यत घेऊन दाखवली. एवढ्यावरही पडळकर थांबले नाहीते. आता पुन्हा पडळकरांनी तेच करून दाखवलं.

आज तिसऱ्यांदा करून दाखवले

आजही सांगलीच्या पुतळ्याचा वाद पेटला. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटनाला पुन्हा पडळकरांनी विरोध केला. पुतळ्याचे उद्घाटन हे मेंढपालांच्या हस्ते होणारच अशी भूमिका घेतली. हजारो कार्यकर्त्यांसह सोबतील सदाभाऊ खोत यांना सोबत घेऊन सांगलीला पिवळी करून सोडली. सगळीकडे पिवळे वादळ दिसले आणि शेवटी पडळकरांनी सरकारला दिलेले आव्हान खरे करत पुतळ्याचं लोकार्पण करून दाखवले.

Padalkar’s guerrilla warfare: Inauguration of Ahilya Devi memorial in Sangli by shepherds opposing Pawar’s dynasty

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था