मौलवीच्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ व्हायरल


विशेष प्रतिनिधी

जम्मू : राजौरी शहरातील मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर मौलवीच्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाषणात मौलवी काही प्रक्षोभक गोष्टी बोलत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ शुक्रवारचा आहे.द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरून तो शेअर केला आहे. Video of Maulawi’s provocative speech goes viral

मौलवीच्या भाषणावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मौलवी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट दोन धर्मांमधील तणाव वाढवणारा असल्याचे म्हणताना दिसत आहे.या चित्रपटात मुस्लिमांविरुद्ध कट रचण्यात आला. त्याचा निषेध करतो. या चित्रपटावर बंदी घाला, असे मौलवी सांगतात. सुमारे 40 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मौलवी म्हणत आहेत, ‘हा चित्रपट बंद केला पाहिजे. आम्ही शांतताप्रिय लोक आहोत. आठशे वर्षे आपण या देशावर राज्य केले. तुम्ही 70 वर्षे राज्य करत आहात, तुम्हाला आमची खूण पुसायची आहे, तुमचा पराभव होईल, पण कलमा वाचणारे मिटणार नाहीत.

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काश्मिरी पंडितांच्या निर्गमन आणि अत्याचारावरील ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून वाद सुरूच आहे. एकीकडे याला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे तर दुसरीकडे काही लोक विरोधही व्यक्त करत आहेत.

Video of Maulawi’s provocative speech goes viral

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था