Republic Day celebrations : प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून सुरू होईल. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. Big decision Republic Day celebrations to be held from January 23 every year, to mark Netaji Subhash Chandra Bose’s birthday
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून सुरू होईल. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारचा हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भाजप सरकारने यापूर्वीच अनेक तारखांना राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस म्हणून घोषित केले आहे.
यामध्ये 14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन, 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांचा जयंती राष्ट्रीय एकता दिवस, 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन आणि 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. आधी ते सरकारी वकील होते पण नंतर त्यांनी खासगी प्रॅक्टिस सुरू केली. बोस यांनी चांगले शिक्षण घेतले होते. त्यांनी कलकत्ता येथील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून तत्त्वज्ञानात पदवी प्राप्त केली. 1919 मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी गेले होते.
Big decision Republic Day celebrations to be held from January 23 every year, to mark Netaji Subhash Chandra Bose’s birthday
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App