भगवंत मान यांचा भगतसिंग यांच्या गावात बुधवारी शपथविधी; खटखड कला येथे जोरदार तयारी


वृत्तसंस्था

चंडीगढ : आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाचे नेते भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची व ६ आमदार मंत्रिपदाची बुधवारी शपथ घेणार आहेत.
हुतात्मा भगतसिंग यांचे गाव खटखड कला येथे १६ मार्च रोजी होणार असलेल्या शपथविधी समारंभात आमदार अमन अरोडा, हरपाल सिंग चीमा, कुलतार सिंग संधवा, हरजोत बैंस, बलजिंद्र कौर आणि कुंवर विजय प्रताप सिंग हे मान यांच्या समवेत शपथ घेणार आहेत. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित त्यांना ही शपथ देतील. Bhagwant Mann sworn in on Wednesday; Intensive preparations in the village of Bhagat Singhमुख्यमंत्र्यांसह १८ आमदार मंत्री बनू शकतात. मंत्रिमंडळाचा विस्तारात ११ आमदारांना मंत्रीपद दिले जाईल. आपने पंजाबमध्ये ११७ सदस्यांच्या विधानसभेत ९२ जागा जिंकल्या. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत आपने २० जागा जिंकल्या होत्या. परंतु, ५ वर्षे पूर्ण होता होता ५ आमदारांनी पक्ष सोडला.  मुख्यमंत्री आणि १७ मंत्र्यांनी एकाच वेळी शपथ घ्यावी, असे पक्षश्रेष्ठींचे मत नाही. यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची संधी मिळते. याबाबत बलवंत मान आधीच म्हणाले आहेत की, फक्त १७ आमदार मंत्री बनू शकतात. त्यामुळे मंत्री न बनणाऱ्या आमदारांनी नाराज होऊ नये.

Bhagwant Mann sworn in on Wednesday; Intensive preparations in the village of Bhagat Singh

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था