मोदी सरकारच्या ‘प्रधानमंत्री स्वामित्व योजने’चा लाभ ; ग्रामस्थांना मिळणार जमीनीचा मालकी हक्क


२४ एप्रिल २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वामित्व योजनेची सुरुवात केली होती. Benefit of Modi Government’s ‘Pradhan Mantri Swamitva Yojana’; Villagers will get land ownership right


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळत आहे.दरम्यान या योजनेच्या अंतर्गत ग्रामस्थांना त्यांच्या जमीनीचा मालकी हक्क मिळेल.इतकेच नव्हे तर ज्यांच्याकडे जमीनीचे कागदपत्र नाहीत.त्यांच्या जमीनी देखील रेकॉर्डमध्ये सरकार रेकॉर्डमध्ये आणेल.

तसेच २०२० – २१ च्या दरम्यान केंद्राची ही योजना महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या काही गावांमध्ये लागू केली आहे. केंद्र सरकार लवकरच याची कक्षा वाढवू शकते.

नेमका याचा हेतू काय

२४ एप्रिल २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वामित्व योजनेची सुरुवात केली होती. सामाजिक-आर्थिक सशक्तीकरण आणि आत्मनिर्भर ग्रामीण भारताला प्रोत्साहन देणे हा या योजने मागचा हेतू आहे.या योजनेतून गावाचा विकास आणि विश्वासाला प्रोत्साहन मिळेल असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

साडेसहा लाख गावांचा या योजनेत सहगाभी करण्याचे लक्ष्य

२०२१ ते २०२५ च्या दरम्यान देशभरात साडेसहा लाख गावांचा या योजनेत सहगाभी करण्याचे लक्ष्य आहे.प्रधानमंत्री स्वामित्व योजनेद्वारे गावातील लोकांना कर्ज आणि इतर सुविधा घेण्यासाठी आपल्या जमीनीचा वापर करता येईल.तसेच ग्रामस्थ जमिनीचे कागद दाखवून कर्ज घेऊ शकतील.

Benefit of Modi Government’s ‘Pradhan Mantri Swamitva Yojana’; Villagers will get land ownership right

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात