‘२०१४ पूर्वी लिंचिंग हा शब्दही ऐकला नव्हता…’, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा


पंजाबमध्ये जमावाकडून झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिंचिंगवरून ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी लिहिले की, 2014 च्या आधी (मोदी सरकार येण्यापूर्वी) लिंचिंग हा शब्द ऐकला नव्हता. Before 2014 the word lynching was not even heard Rahul Gandhi targets central government


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबमध्ये जमावाकडून झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिंचिंगवरून ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी लिहिले की, 2014 च्या आधी (मोदी सरकार येण्यापूर्वी) लिंचिंग हा शब्द ऐकला नव्हता.

पंजाबमधील दोन्ही घटनांवर बहुतेक राजकारणी उघडपणे बोलत नाहीत, कारण प्रकरणे बेअदबीशी संबंधित आहेत. मात्र, राहुल गांधींपूर्वी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अवमान करणाऱ्यांना जगजाहीर फासावर लटकवले पाहिजे, असे ते म्हणाले होते.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही राहुल गांधींच्या या ट्विटवर टीका केली आहे. त्यांनी राहुल यांचे वडील राजीव गांधी यांना लिंचिंगचे जनक म्हटले आहे.

पंजाबात काय घडले?

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी सुवर्ण मंदिर आणि कपूरथळा येथील लिंचिंगच्या घटनांनी राज्यात तसेच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. रविवारी कपूरथलाच्या निजामपूर गावात गुरुद्वारामध्ये एका तरुणाची बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्यावर निशान साहिबचा (शिखांचा धार्मिक ध्वज) अपमान केल्याचा आरोप होता. मात्र, नंतर हे प्रकरण चोरीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या व्यक्तीला अनेक तास खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते, संतप्त जमावाने जबरदस्तीने खोलीत घुसून त्याच्यावर हल्ला केला. तलवारीने वारही झाले. या घटनेत तीन पोलीसही जखमी झाले आहेत.

याआधी शनिवारी एक अज्ञात व्यक्ती सुवर्ण मंदिराच्या आतील ग्रील्सवर चढून पवित्र गुरू ग्रंथ साहिब ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला होता. त्या व्यक्तीने तिथे ठेवलेली तलवारही उचलली होती. तेव्हाच लोकांनी त्याला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी मृताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात (15 डिसेंबर) सुवर्ण मंदिराची एक घटना चर्चेत आली होती. त्यानंतर एका व्यक्तीने ‘गुटखा साहिब’ हा पवित्र ग्रंथ सुवर्ण मंदिराच्या तलावात फेकून दिला होता.

Before 2014 the word lynching was not even heard Rahul Gandhi targets central government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात