वृत्तसंस्था
नवी दिल्ली : होळी, महाशिवरात्रीसह बँका मार्चमध्ये १३ दिवस बंद राहणार आहेत. सार्वजिनिक सुटीमुळे बँकविषयक कामे पूर्ण करण्यासाठी जनतेला आतापासून नियोजन करावे लागणार आहे. Banks will be closed on holi and maha shivaratri in march; Bank holidays in March 2022 list
मार्च महिन्यात लोकांना बँकिंग, इंव्हेस्टमेंट आणि आयकराशी संबंधित अनेक कामे करावी लागतात. तसेच, होळीसारखा मोठा सणही साजरा केला जातो. महाशिवरात्रीही साजरी केली जाणार आहे. या वर्षात मार्चमध्ये एकाच वेळी हे दोन मोठे सण साजरे केले जाणार आहेत. यामुळे बँकेशी संबंधित आपले कोणतेही काम असेल, तर ते प्राधान्याने करून घ्यायला हवीत. कारण मार्च महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध झोनमध्ये एकूण 13 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
१ मार्च (मंगळवार) : महिन्याच्या पहिल्याच दिवशी महाशिवरात्रीनिमित्त अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहणार आहेत.
३ मार्च (गुरुवार) : लोसार निमित्त गंगटोक येथे बँकांचे कामकाज बंद असेल.
४ मार्च (शुक्रवार) : चपचार कुट निमित्त आयजोलमध्ये बँकांना सुट्टी असेल.
६ मार्च (रविवार) : रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी
१२मार्च (शनिवार) : दुसरा शनिवार असल्याने सुट्टी.
१३ मार्च (रविवार) : साप्ताहिक सुट्टी असेते.
१७ मार्च (गुरुवार) : होळी निमित्त डेहरादून, कानपूर, लखनौ आणि रांची झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल.
१८ मार्च (शुक्रवार) : होली//डोल जत्रा) निमित्त बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम वगळता इतर सर्व झोनमध्ये बँका बंद राहतील.
१९ मार्च (शनिवार) : होली/ओसांगचा दुसरा दिवस असल्याने भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथे बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
२० मार्च (रविवार) :साप्ताहिक सुट्टी
२२ मार्च (मंगलवार) : बिहार दिवस निमित्त पाटणा झोनमद्ये बँका बंद असतील.
२६ मार्च (शनिवार) : चौथा शनिवार बँका बंद
२७ मार्च (रविवार) : साप्ताहिक सुट्टी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App