विशेष प्रतिनिधी
हरदोई: तुष्टीकरणाचे राजकारण करुन आमच्या सणांवर बंदी घातली. आता उत्तर प्रदेशची जनताच त्यांना 10 मार्चला उत्तर देईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. रविवारी हरदोई येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, तुमचा उत्साह आपल्या सर्वांसाठी मोठा आशीर्वाद आहे.Ban on our festivals by politicizing , people will answer on March 10, PM attacks Samajwadi Party
होळीसारख्या पवित्र सणाचा हरदोईच्या पवित्र भूमीशी असलेला संबंध आपल्या सर्वांना माहीत आहे. हरदोई आणि यूपीच्या लोकांनी दोनवेळी रंगपंचमी खेळण्याची तयारी केली आहे. पहिली 10 मार्चला भाजपच्या विजयावर खेळली जाणार आहे. पण, ही रंगपंचमी मोठ्या थाटामाटात साजरी करायची असेल, तर त्यासाठी भाजपला मतदान करावे लागेल.
तिसऱ्या टप्प्यातही कमळाच्या चिन्हावर भरपूर मतदान होत आहे. आज यूपीसोबतच पंजाबमध्येही मतदान होत आहे, तेथील लोकही पंजाबच्या विकासासाठी, पंजाबच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या अखंडतेसाठी भाजपला पाठिंबा देत आहेत. यूपीच्या पुढील टप्प्यांची जबाबदारीही तुम्ही घेतली आहे. पाच वर्षांपूर्वी माफियावाद्यांनी यूपीची काय अवस्था केली होती?
व्यापारी व्यवसाय करण्यास घाबरत होते. दिवसाढवळ्या लुटमार आणि इतर गंभीर गुन्हे होत असतं. निवडणुकीत वाईटरित्या पराभूत होणारे हे लोक आता जातीच्या नावावर विष पसरवतील. पण तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तो म्हणजे यूपीचा विकास, देशाचा विकास.समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, खुचीर्साठी कुटुंबाशी सर्वाधिक भांडणारे हे लोक आहेत.
त्यामुळे हे टोकाचे कुटुंबवादी कोणत्याही जातीचे किंवा समाजाचे असू शकत नाहीत. यूपीमध्ये तुम्ही ज्या दुहेरी इंजिनाचे सरकार आशीर्वादित केले आहे, ते कोणत्याही एका कुटुंबाचे सरकार नाही. दिल्लीतील भारत सरकार हे कोणत्याही एका कुटुंबाचे सरकार नाही. हे गरीब, शेतकरी आणि तरुणांचे सरकार आहे.
आम्ही तुमच्यासाठी 5 वर्षे खूप मेहनत केली आहे. त्यांच्या काळात गरिबांसाठी केवळ 34 हजार शौचालये बांधली. मात्र योगीजींच्या आगमनानंतर 5 लाख शौचालये बांधण्यात आली. कुठे 34 हजार आणि कुठे 5 लाख! हा पैसा गेला कुठे? ज्यांनी तेव्हा तुमची घरे अंधारात ठेवली, तेच आज तुम्हाला खोटी आश्वासने देत आहेत. लक्षात ठेवा, त्यांच्या काळात तुमच्या गावांना दिवसातून किती तास वीज मिळत होती? मला नेहमी आठवते की उत्तर प्रदेशात वीज आली तर एकेकाळी बातमी व्हायची.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App