Baba Ramdev : अॅलोपॅथीच्या उपचारांवर टीका करून वादग्रस्त ठरलेले योगगुरू बाबा रामदेव हेसुद्धा कोरोनाची लस घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनपासून देशातील प्रत्येक राज्यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस मोफत देण्याची घोषणा केली. याबाबत बाबा रामदेव यांनी सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले आणि म्हटले की, मीसुद्धा लवकरच ही लस घेणार आहे. बाबा रामदेव यांनी लोकांना योग आणि आयुर्वेदाचा अभ्यास करण्यास सांगितले. योग रोगांविरूद्ध ढाल म्हणून कार्य करतो आणि कोरोनापासून होणारी गुंतागुंत टाळतो. Baba Ramdev Also Getting Corona Vaccine Soon, Says My Fight is With Drug mafiya not With Doctors
विशेष प्रतिनिधी
हरिद्वार : अॅलोपॅथीच्या उपचारांवर टीका करून वादग्रस्त ठरलेले योगगुरू बाबा रामदेव हेसुद्धा कोरोनाची लस घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनपासून देशातील प्रत्येक राज्यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस मोफत देण्याची घोषणा केली. याबाबत बाबा रामदेव यांनी सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले आणि म्हटले की, मीसुद्धा लवकरच ही लस घेणार आहे. बाबा रामदेव यांनी लोकांना योग आणि आयुर्वेदाचा अभ्यास करण्यास सांगितले. योग रोगांविरुद्ध ढाल म्हणून कार्य करतो आणि कोरोनापासून होणारी गुंतागुंत टाळतो.
ड्रग माफियांवर भाष्य करताना रामदेव म्हणाले, “आमचे कोणत्याही संघटनेशी वैर नाही. सर्व डॉक्टर या पृथ्वीवर देवाने पाठविलेले दूत आहेत. ते या ग्रहासाठी भेट आहेत. आमचा लढा देशातील डॉक्टरांशी नाही. आमचा विरोध करणारे डॉक्टर हे एखाद्या संस्थेच्या माध्यमातून करत नाहीयेत.”
बाबा रामदेव पुढे म्हणाले, “आम्हाला अशी इच्छा आहे की, औषधांच्या नावाखाली कोणाला त्रास देऊ नये आणि लोकांनी अनावश्यक औषधे टाळावीत. आणीबाणीच्या वेळी आणि शस्त्रक्रियांसाठी अॅलोपॅथी चांगली आहे यात शंका नाही.” ते म्हणाले, पंतप्रधान जनऔषधी स्टोअर सुरू करावे लागले, कारण औषध माफियांनी फॅन्सी शॉप्स उघडली आहेत जिथे मूलभूत आणि अत्यावश्यक वस्तूंच्या ऐवजी जादा किमतींवर अनावश्यक औषधांची खरेदी-विक्री होते.”
अॅलोपॅथीच्या उपचारांबद्दल बाबा रामदेव यांनी गेल्या महिन्यात एक टीका केली होती. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्या काही औषधांवर प्रश्न विचारत ते म्हणाले की, “कारोनाच्या उपचारांमध्ये अॅलोपॅथीची औषधे घेतल्यामुळे कोट्यावधी लोकांचा मृत्यू झाला.” त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता आणि पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. अॅलोपॅथीची बदनामी करणार्यांवर कारवाईसाठी आयएमएने पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले होते.
Baba Ramdev Also Getting Corona Vaccine Soon, Says My Fight is With Drug mafia not With Doctors
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App