विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाममधील मुस्लिमबहुल भागात लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यासाठी पाप्युलेशन आर्मी स्थापन केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभेत दिली. सुमारे एक हजार तरुणांना लोअर आसाममधील मुस्लिम बहुल भागात पाठविले जाणार आहे.Assam to form population army, use contraceptives campaign in Muslim areas, Chief Minister Hemant Biswa Sarma
हेमंत बिस्वा सरमा यांनी धाडसाने लोकसंख्या नियंंत्रणाचा प्रस्ताव ठेवला आहे. राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागातील लोकसंख्येचा स्फोट झाल्याची माहिती विधानसभेत देऊन मुख्यमंत्री म्हणाले, सुमारे एक हजार तरुण लोकसंख्या नियंत्रण उपायांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि गर्भ निरोधक पुरवठा करणार आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांचे एक दलच त्यासाठी गठित करण्यात येईल. गर्भनिरोधकांविषयी जागरूकता निर्माण करण्याचे तसेच गर्भनिरोधकांचा पुरवठा करण्याचे कामही हे दल करतील.
मुख्यमंत्री म्हणाले, २००१ ते २०११ या काळात आसाममधील हिंदूंमध्ये लोकसंख्येची वाढ १० टक्के होती. मुस्लिमांमध्ये हिच वाढ २९ टक्के होती. लोकसंख्येचा दर कमी झाल्याने आसाममधील हिंदूंची जीवनशैली सुधारली आहे. त्यांची घरे प्रशस्त आहेत. वाहनांचा वापर करत आहेत. त्यांची मुले डॉक्टर, अभियंता बनत आहेत.
आसाममधील लोकसंख्येची वाढ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोहीम उघडली आहे. त्यासाठी राज्यातील अल्पसंख्यांकांना प्रेरित केले जांण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उपाययोजनांचा एक भाग म्हणजे स्वैच्छिक नसबंदी आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी दोन मुलांच्या मर्यादेची अंमलबजावणी करणे हे आहे.
अप्पर आसाममधील नागरिकांत लोकसंख्या नियंत्रणाची जनजागृती करण्याची गरज नाही. कारण तेथे लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. मात्र, मध्य आणि लोअर आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोण प्रयत्न करण्याची गरज असल्याचे हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App