आसाममधील तेजपूरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.7 मोजण्यात आली. तेजपूरच्या पश्चिम-नैऋत्येस 35 किमी अंतरावर भूकंप झाला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. भूकंपाची वेळ सकाळी 10.19 ची सांगण्यात येत आहे. मात्र, भूकंपामुळे कुठलीही हानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. Assam earthquake 3.7 richter scale magnitude occurred 35 km west southwest of Tezpur
वृत्तसंस्था
दिसपूर : आसाममधील तेजपूरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.7 मोजण्यात आली. तेजपूरच्या पश्चिम-नैऋत्येस 35 किमी अंतरावर भूकंप झाला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. भूकंपाची वेळ सकाळी 10.19 ची सांगण्यात येत आहे. मात्र, भूकंपामुळे कुठलीही हानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
याच्या जवळपास महिनाभरापूर्वीही आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 3 ऑक्टोबर रोजी तेजपूर येथेच भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 मोजली गेली. तेजपूर येथे दुपारी 2:40 वाजता पृथ्वी हादरली. मात्र, या काळात जीवित व वित्तहानी झाली नाही. सुमारे दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधूनही भूकंपाचे वृत्त आले होते. भूकंप विज्ञान केंद्राच्या म्हणण्यानुसार, येथे २ नोव्हेंबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंप सकाळी 9:31 वाजता झाला आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 मोजली गेली.
लडाखमधील हेनले गावापासून ५१३ किमी पूर्वेला भूकंप झाला. त्यानंतर लोक घराबाहेर पडले. येथेही भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. यापूर्वी शनिवारी या केंद्रशासित प्रदेशात भूकंप झाला होता. लेहमधील अल्ची परिसरात त्याचे धक्के जाणवले. अल्ची भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. त्याची वेळ भारतीय वेळेनुसार 9:59 मिनिटे आहे. भूकंपाची खोली 10 किमी खाली होती. त्याचे केंद्र अल्चीच्या दक्षिण-नैऋत्येस 103 किमी होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App