आसाम व मेघालयाचा सीमाप्रश्न सुटला; गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आसाम व मेघालयाचा गेल्या अनेक वर्षांपासून तेवत असलेला सीमाप्रश्न सुटला आहे. १२ पैकी सहा ठिकाणांबाबत असलेल्या सीमावादावर समेट घडवून आणणाऱ्या दस्तऐवजावर सामंजस्य करार झाला.गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रश्न मार्गी लागला आहे. Assam and Meghalaya border issue resolved; The agreement was signed in the presence of Home Minister Amit Shah



महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाप्रमाणे हा वाद ५० वर्षांपासून सुरू होता. पूर्वोत्तरसाठी हा ऐतिहासिक दिन असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा व मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. करारामुळे आता उभय राज्यांतील ८८४.९ किमी सीमेसह १२ ठिकाणांपैकी सहा ठिकाणांवरील वाद संपुष्टात येईल. गृह मंत्रालयातील करारानंतर शहा म्हणाले, करारामुळे दोन्ही राज्यांत आता ७० टक्के सीमावादाची सोडवणूक झाली आहे.

वादंगाला १९७२ मध्ये सुरुवात

मेघालयाची स्थापना १९७२ मध्ये आसाममधून बाहेर पडून झाली होती. परंतु नव्या राज्यामुळे आसामच्या पुनर्स्थापना अधिनियम १९७१ ला आव्हान दिले होते. त्यातून सीमेवरील बारा भागांवर वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर दोन्ही राज्यातील नागरिकांना त्यातही सीमेवरील लोकांना हे त्रासाचे झाले होते.

Assam and Meghalaya border issue resolved; The agreement was signed in the presence of Home Minister Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात