Asansol Byelection : भाजपमधून आलेल्या शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियोंना ममतांच्या तृणमूलची पोटनिवडणुकीत उमेदवाराची बक्षिसी!!


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये जाहीर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपमधून आलेले नेते शत्रुघ्न सिन्हा आणि बाबुल सुप्रियो यांना तृणमूल काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली आहे. Asansol Byelection shatrugh sinha babul supriyo

शत्रुघ्न सिन्हा यांना असनसोल लोकसभेची उमेदवारी, तर बाबुल सुप्रियो यांना बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे. ममतांनी आपल्या ट्विटर हँडलवर या दोघांची उमेदवारी जाहीर केली आहे.

बाबुल सुप्रियो हे 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या तिकिटावरुन असनसोल मधून खासदार झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी केंद्रीय मंत्री पदाचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.

ममता बॅनर्जी यांनी बाबुल सुप्रियो यांना पुन्हा लोकसभेत पाठवण्याऐवजी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली आहे, तर बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांना बाबुल सुप्रियो यांच्या असनसोल लोकसभा मतदार संघातल्या पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. एक प्रकारे ममता बॅनर्जी यांनी भाजपमधून आयात केलेल्या उमेदवारांना नेत्यांना उमेदवारी देऊन भाजप मधल्या संभाव्य बंडखोरांना खुणावले आहे.

Asansol Byelection shatrugh sinha babul supriyo

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती