विश्व हिंदू परिषदेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. रविंद्र नारायण सिंह यांची निवड


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेच्या नूतन अध्यक्षपदी प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. रविंद्र नारायण सिंह (डॉ. आर. एन सिंह) यांची निवड झाली आहे.
फरीदाबाद येथील मानव रचना विश्वविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी आयोजित केलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रबंध समिति व प्रन्यासी मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीपूर्वी सिंह यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. As the new President of Vishwa Hindu Parishad Dr. Selection of Ravindra Narayan Singh

मूळचे बिहारच्या सहरसाचे रहिवासी असलेले आणि अग्रेगण्य शल्यचिकित्सक अशी त्यांची ख्याती आहे. त्यांना पद्मश्री ने गौरविले आहे. जैन यांनी सांगितले की, माजी अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश विष्णु सदाशिव कोकजे यांनी वृद्धापकाळाचे कारण सांगून स्वत: पदमुक्त करण्याचे निवेदन दिले होते. ते स्वीकारले गेले. त्यांच्या जागी डॉ. आर.एन. सिंह यांची नियुक्ती केली आहे. परंतु अन्य पदाधिकारी यांच्यात कोणताच फेरबदल केलेला नाही.

मेवातमध्ये धर्मांतर रोखण्यासाठी समिती

विश्व हिन्दू परिषद के केंद्रीय संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन म्हणाले, मेवातमध्ये धर्मांतर रोखण्यासाठी गावात समिती स्थापन केली जाणार आहे. मेवातला दुसरे काश्मीर बनू देणार नाही. मेवातमधून पलायन होणार नाही. तेथे पराक्रमाने राहिले जाईल.

मेवात येथील हिंदू समाजाला पाठींबा देण्यासाठी हिंदू समाज प्रखरपणे उभा राहिल. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या चारही घोषणांची अंमलबजावणी करावी. मेवातमध्ये गोहत्या बंदी लागू करावी, धर्मनातरबंदी कायदा बनवावा, हिंदू धर्मस्थळाचे संरक्षण करावे, मेवातमध्ये बीएसएफ कॅंप स्थापित करावा, अशा या चार घोषणा आहेत.

As the new President of Vishwa Hindu Parishad Dr. Selection of Ravindra Narayan Singh

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी