वृत्तसंस्था
उज्जैन : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज मध्य प्रदेशात उज्जैन मध्ये महाकालेश्वर याचे दर्शन घेतले आणि तेथे रुद्राभिषेक केला. अरिफ मोहम्मद खान हे सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तेथे काल त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभाग घेतला. देशाचे स्वातंत्र्य कोणा एका व्यक्तीमुळे मिळाले नसून सर्व भारतीयांच्या त्यागातून आणि समर्पण आतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. Arif Mohammad Khan’s Darshan of Mahankaleshwar in Ujjain – Rudrabhishek
Madhya Pradesh | Kerala Governor Arif Mohammed Khan offered prayers at Mahakaleshwar temple in Ujjain today pic.twitter.com/xbIe9O3ELZ — ANI (@ANI) January 8, 2022
Madhya Pradesh | Kerala Governor Arif Mohammed Khan offered prayers at Mahakaleshwar temple in Ujjain today pic.twitter.com/xbIe9O3ELZ
— ANI (@ANI) January 8, 2022
स्वातंत्र्याचा खरा अर्थ एकमेकांशी प्रेमाने वागून, प्रेमाचा एकमेकांना प्रतिसाद देऊन सिद्ध होतो. मतभेद असले तरी त्यामध्ये सामंजस्याने आणि चर्चेतून मार्ग काढणे हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे, असे मत अरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे ढिलाई दाखवली गेली. तिचे उल्लंघन झाले. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देशभरात महादेव मंदिरांमध्ये जाऊन महामृत्युंजय जप आणि पूजाअर्चा केली. अरिफ मोहम्मद खान यांनी आज सकाळी महांकाळेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि तेथे रुद्राभिषेक केला. देशात शांतता आणि सौहार्द नांदावी अशी प्रार्थना आपण महाकालेश्वरला केली, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App