अणूबॉँब म्युझियममध्ये ठेवायला आहेत का? काश्मीर, पॅलेस्टाईन मुक्त करण्यासाठी वापरा, पाकिस्तानच्या संसदेत खासदार बरळला

आम्ही बनविलेले अणुबॉँब म्युझियममध्ये ठेवायला आहेत का ? पॅलेस्टाईन आणि काश्मीर मुक्त करण्यासाठी ते वापरा असे पाकिस्तानचा एक खासदारच बरळला आहे. पाकिस्तानचे खासदार मौलाना चित्राली यांनी इम्रान खान सरकारला इस्त्रायलविरोधात जिहाद पुकारण्याचेही आवाहन केले आहे. Are atomic bombs to be kept in museums? Use it to liberate Kashmir,Palestine, MP in Pakistan’s parliament


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : आम्ही बनविलेले अणुबॉँब म्युझियममध्ये ठेवायला आहेत का ? पॅलेस्टाईन आणि काश्मीर मुक्त करण्यासाठी ते वापरा असे पाकिस्तानचा एक खासदारच बरळला आहे. पाकिस्तानचे खासदार मौलाना चित्राली यांनी इम्रान खान सरकारला इस्त्रायलविरोधात जिहाद पुकारण्याचेही आवाहन केले आहे.

मौलाना चित्राली पाकिस्तानी संसदेमध्ये बोलताना म्हणाले, पॅलेस्टाईन आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सरकारने अणुबॉम्ब आणि मिसाईलचा वापर करण्यास मागे पुढे पाहू नये. आम्ही अणुबॉम्ब काय म्युझियममध्ये पाहण्यासाठी बनविले आहेत का? जर आम्ही पॅलेस्टाईन आणि काश्मीरला स्वतंत्र करू शकत नाही तर आम्हाला मिसाईल, अणुबॉम्ब आणि विशाल सैन्याती काहीच गरज नाही.पॅलेस्टाईनवर इस्त्रायलकडून जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. इस्त्रायलविरोधात पाकिस्तान तुर्कस्तानसोबत मिळून षडयंत्र रचत आहे. तुर्की आणि पाकिस्तानला असे वाटत आहे की, या द्वारे आपण मुस्लिम देशांची सहानुभूती मिळवू आणि मुस्लिमांचे नेते बनू. यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री पॅलेस्टाईनच्या बहाण्याने तुकीर्ला गेले असून मुस्लिम देशांची आघाडी उघडण्याचे स्वप्न पाहत आहेत.

इस्त्रायलविरोधात 57 मुस्लिम देशांना एकत्र आणण्यासाठी सोमवारी एक परिषद बोलविण्यात आली होती. हे देश इस्त्रायलविरोधात एकत्र येण्याऐवजी आपापसातच भिडले आहेत. त्यामुळे खासदार मौलाना चित्राली यांनी इम्रान खान सरकारला इस्त्रायलविरोधात जिहादच एकमेव उपाय असल्याचे म्हटले आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले केले जात आहेत. इस्रायलदेखील एअरस्ट्राइक करून हमासला प्रत्युत्तर देत आहे. हे सर्व हल्ले गाझामध्ये होत आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की इस्लामिक समूह हमासविरोधात सुरू असलेल्या इस्रायली युद्धाचा परिणाम सामान्य लोकांवर होत आहे. इस्रायलकडून मानवी वस्ती असलेल्या भागांत करण्यात आलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत 213 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Are atomic bombs to be kept in museums? Use it to liberate Kashmir,Palestine, MP in Pakistan’s parliament

महत्त्वाच्या बातम्या