विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : १९८५ बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आणि माजी मनुष्यबळ आणि माहिती प्रसारण सचिव अमित खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले.अमित खरे ३० सप्टेंबर रोजी उच्च शिक्षण सचिव म्हणून निवृत्त झाले.Appointment of Amit Khare as Advisor to Prime Minister Modi
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने खरे यांची पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. पीएमओमध्ये त्यांची कंत्राटी नियुक्ती भारत सरकारच्या सचिवांच्या रँक आणि स्केलवर करण्यात आली आहे.ते दोन वर्षे या पदावर राहतील.
पंतप्रधान मोदींच्या निर्देशानुसार नवीन शिक्षण धोरण २०२० तयार करण्यात आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयात असताना डिजिटल मीडिया नियम बदलण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अमित खरे पारदर्शकतेसह स्पष्ट निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामध्ये उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख आणि माहिती आणि प्रसारण सचिव पद भूषवलेल्या काही सचिवांपैकी ते एक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App