अतिक्रमण विरोधी कारवाईतील म्हणे पीडित, तथाकथित उदारमतवाद्यांकडून मोदी सरकारच्या प्रतिमा हननसाठी मदतीसाठी निधी संकलन मोहीम


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आजपर्यंत लाखो अतिक्रमण विरोधी कारवाया झाल्या, मात्र आता होत असलेल्या कारवायांचा उदारमतवाद्यांना पुळका आला आहे. अतिक्रमण विरोधी कारवाईत ज्यांची बेकायदेशिर घरे पाडली त्यांना ‘पीडित’ म्हटले जात आहे. यासाठी तथाकथित उदारमतवाद्यांकडून निधी संकलन मोहीम सुरू करण्यात आली आहे.Anti-encroachment campaign, fundraising campaign by so-called liberals to tarnish Modi government’s image

पीडितांना मदत देण्यापेक्षा मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा हननाचे हे षडयंत्र असल्याचे म्हटले जात आहे.उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि राष्ट्रीय राजधानीतील नवी दिल्ली महानगरपालिका प्राधिकरणांसह विविध राज्य सरकारांनी अतिक्रमणधारकांच्या मालकीची इमारत पाडली होती, त्यानंतर ‘पीडितांना’ मदत करण्याच्या उद्देशाने मोहीम सुरू करण्यात आली आहे.कथित ‘फॅक्ट-चेकिंग’ वेबसाइट अ’३ न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांनी ज्यांची घरे आणि दुकाने पाडण्यात आली होती अशा लोकांना मदत करण्यासाठी निधी उभारणी मोहीम सुरू करणारे ट्विट केले. त्यांनी इतरांना लिंक शेअर करण्यास सांगितले जेणेकरून ते खरगोन, करौली, सेंधवा, जहांगीरपुरी आणि रुरकी येथील पीडितांना मदत देऊ शकतील. अनेक डाव्या-उदारमतवादी ‘पत्रकारांनी’ देखील लोकांना मुस्लिम ‘पीडितांना’ निधी देण्यास सांगणाऱ्या कथित निधी उभारणीच्या लिंक्स शेअर केल्या.

मोहम्मद झुबेर यांनी शेअर केलेल्या निधी उभारणीच्या प्लॅटफॉर्म केटोच्या लिंक्सनुसार, पुनर्वसन कार्य Miles2Smile Foundation या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थेद्वारे केले जात आहे. धक्कादायक म्हणजे हिच संस्था देशात अवैधरित्या स्थायिक होणाऱ्या रोहिंग्या मुस्लिम स्थलांतरीतांसाठी निधी उभारते.

याच संस्थेने फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या हिंदूविरोधी दिल्ली दंगलीतील मुस्लिम ‘पीडितांना’ मदत करण्यासाठी आठ निधी उभारणी मोहिमा राबवल्या आहेत. या संस्थेचे संस्थापक आसिफ मुजतबा यांच्या म्हणण्यानुसार, संस्थेने हरियाणातील नूह येथे रोहिंग्या शिबिरात शिक्षण केंद्र सुरू केले होते. संस्थेने हरियाणातील नुह येथे रोहिंग्या निर्वासितांसाठी बांधकाम कामासाठी निधी उभारला होता आणि घरेही बांधली होती.

Anti-encroachment campaign, fundraising campaign by so-called liberals to tarnish Modi government’s image

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था