भारताच्या शस्त्रसांभारात आणखी एक मिसाईल दाखल, काही मिनिटांतच शत्रूला उध्वस्त करू शकणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ओडिशा येथील बालासोरमध्ये इंटीग्रेटेड टेस्ट रेंज द्वारे हवेत थेट निशाणा साधणाºया मिसाइलचे रविवार रोजी परीक्षण केले गेले. मध्यम रेंज असलेल्याया मिसाइलचे परीक्षण सफल झाले आहे. टेस्टिंग दरम्यान या मिसाइलने आपले टार्गेट काही मिनिटांमध्येच उद्ध्वस्त केले आणि अपेक्षित रिझल्ट देखील मिळवला.Another missile in India’s arsenal, capable of destroying enemy in minutes

या मिसाइलची निर्मिती रक्षा अनुसंधान आणि विकास संगठन म्हणजे डीआरडीओने इस्त्राईल एयरोस्पेस इंडस्ट्रीच्या सहकार्याने केली आहे. हे मिसाइल जमिनीवरून थेट हवेत निशाणा साधते. ही मिसाईल इस्त्राएलच्या बराक मिसाईलच्या धर्तीवर बनविली आहेत.



या मिसाईलचे वजन सर्वसाधारण पणें 275 किलो ग्रॅम आहे . या मिसाईलची लांबी 4.5 मीटर आणि व्यास 0.45 मीटर आहे .या विशेष अशा मिसाइलवर 60 किलोग्रॅम चे शस्त्र (वॉरहेड) लोड केले जाऊ शकते. ही एक सेकंड स्टेज असणारी मिसाइल आहे,जे लॉन्च केल्यानंतर कमी धूर बाहेर सोडते.

हे मिसाईल 70 किलोमीटर पर्यंतच्या रेंज मध्ये येणाºया लक्ष्याला उद्ध्वस्त करू शकतं, असं डीआरडीओनं म्हटलं आहे. 2,448 किलोमीटर प्रति तास वेगाने शत्रूवर हल्ला साधू शकते. फक्त गतीच नाही तर या मिसाइलचे खूप सारे विशेष गुणधर्म आहेत. जर शत्रु आपल्या मिसाईल मध्ये रेडिओ फ्रीविन्सीचा वापर करत असेल तर समोरील शत्रूला गाफील ठेवून शत्रूवर हल्ला देखील हे मिसाईल करु शकते.

या विशेष गुणामुळे हे मिसाईल भारतीय सेनेसाठी खूपच लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर भारतीय सेनेच्या शस्त्रसाठयामध्ये देखील नव्याने आलेल्या या मिसाईलमुळे भारतीय सैन्यात अजून एका मिसाईल ची भर झाली आहे.

Another missile in India’s arsenal, capable of destroying enemy in minutes

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात