आणखी एक स्वदेशी लस : बायोलॉजिकल-ई च्या लसनिर्मितीसाठी १५०० कोटींची आगाऊ रक्कम : ३० कोटी डोस तयार करणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्वदेशी कोरोनाविरोधी लसीच्या निर्मितीसाठी बायोलॉजिकल-ई ला १५०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यातून ३० कोटी डोस तयार केले जाणार आहेत. Another indigenous vaccine: 1500 crore paid by the Ministry of Health for production of Biological-E vaccine

बायोलॉजिकल-ई च्या लसीची पहिली आणि दुसरी वैद्यकीय चाचणीचे निकाल अनुकूल आले आहेत. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु झाली आहे.
ऑगस्ट-डिसेंबर २०२१पर्यंत ही लस हैदराबाद येथील बायोलॉजिकल -ईद्वारे तयार करून साठवली जाईल. बायोलॉजिकल-ईने विकसित केलेली लस ही आरबीडी प्रोटीन उप-युनिट लस आहे. ती येत्या काही महिन्यांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रीय तज्ञ गटाने लासीबाबत बायोलॉजिकल-ई च्या प्रस्तावाची तपासणी केली. तसेच मंजुरीसाठी शिफारस केली. बायोलॉजिकल-ई या देशी लसी उत्पादकांना संशोधन आणि विकास आणि आर्थिक सहाय्य देऊन प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने अनुदान दिला आहे, ”असे निवेदनात म्हटले आहे.बायोटेक्नॉलॉजी विभागाने अर्थसहाय्य म्हणून १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले. तसेच आरोग्य विज्ञान तंत्रज्ञान संस्थाद्वारे सर्व अभ्यास करण्यासाठी बायोलॉजिकल -ईबरोबर भागीदारीही केली आहे. फरीदाबाद येथील भारत बायोटेकबरोबर तंत्रज्ञानाच्या हस्तांतर कराराद्वारे कोव्हक्सीन तयार करण्यासाठी केंद्र सरकारने इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड आणि बीआयबीसीओएल आणि सरकारी मालकीचे हफकीन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना सहकार्य केले आहे.

Another indigenous vaccine: 1500 crore paid by the Ministry of Health for production of Biological-E vaccine

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय