वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 2022 अखेर शेअर बाजारात सध्याच्या पातळीपेक्षा 12% तेजीची शक्यता आहे. ही तेजी देशांतर्गत बाजारासह अमेरिकन बाजारातही येईल. विश्लेषकांच्या मते, भारतीय बाजाराला परदेशी गुंतवणूकदारांचे पुनरागमन आणि महागाई कमी होण्याचा फायदा मिळेल.Another 12% rise in stock market possible by year-end, return of foreign investors, possible fall in inflation
जे. पी. मॉर्गन चेजचे मार्को कोलानोविक म्हणाले, डिसेंबर अखेरपर्यंत अमेरिकन बाजारात सध्याच्या पातळीपेक्षा १२ टक्के तेजी शक्य आहे. वर्षअखेर अमेरिकन इक्विटी फंड्समध्ये १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होईल. यामुळे अमेरिकन बाजारात तेजी येईल.
पोर्टफोलिओ संतुलित करण्याची वेळ
निफ्टी १७ जूनच्या पातळीपासून १६ टक्क्यांपेक्षा जास्त वधारला. आम्ही आधी पोर्टफोलिओचा ७० टक्के हिस्सा इक्विटीत ठेवण्याचा सल्ला देत होतो. मात्र, आता सुमारे ६० ते ६५ टक्के इक्विटी असली पाहिजे, असे जियोजित फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App