विशेष प्रतिनिधी
मुंबई : महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अँटील यांना महिंद्रा XUV700 गाडी भेट म्हणून दिली आहे. 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या ह्या दोघांनाही बिझनेसमन आंनद महिंद्रा यांनी XUV700 देण्याचे वचन दिले होते.
Anand Mahindra presents Mahindra XUV700 to Tokyo Olympic gold medalist Neeraj Chopra and Tokyo Paralympic champion Sumit Antil
टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सुमितने 68.55 मीटरच्या इतक्या जागतिक विक्रमी थ्रो सह पुरुषांच्या F64 स्पर्धेत भालाफेक मध्ये विजेतेपद पटकावले होते.
Neeraj Chopra : नीरज चोप्राचा सोशल मीडियावरही धमाका, 24 तासांत 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स
2020 च्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय टीमने पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह 19 पदके मिळविली आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या टीमने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि सात पदके जिंकली आहेत.
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून जी बातमी शेअर केली आहे. तसेच नीरज चोप्राने देखील एम आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App