५ ऑगस्ट २०१९ हा काश्मिर खोऱ्यातल्या दहशत, भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या अंताचा दिवस

जम्मू आणि काश्मीरच्या तीन दिवसांच्या भेटीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावर उतरले. दोन वर्षांपूर्वी कलम 370 रद्द करण्याच्या भारत सरकारच्या मोठ्या निर्णयाचे नेतृत्व केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच काश्मिर दौरा आहे. Amit Shah landed in J&K’s Srinagar airport this morning for a three-day visit – his first since he led the government’s charge to scrap Article 370 two years ago and told that Aug 5, 2019 marked end of terror, corruption, nepotism in Kashmir valley


वृत्तसंस्था

श्रीनगर : “पाच ऑगस्ट 2019 हा काश्मिर खोऱ्यातील दहशत, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या अंताचा दिवस म्हणून इतिहासात नोंदवला गेला आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

जम्मू-काश्मिर खोऱ्यात लागू असलेले कलम 370 रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि धाडसी निर्णय प्रक्रियेचे नेतृत्त्व अमित शहा यांनी केले होते. हा निर्णय झाल्यानंतर शहा पहिल्यांदाच काश्मिर खोऱ्याच्या तीन दिवसांच्या भेटीवर आले आहेत. शनिवारी संध्याकाळी जे अँड के युथ क्लबच्या तरुणाईशी संवाद साधला असता ते बोलत होते. तत्पुर्वी श्रीनगरला उतरल्या उतरल्या त्यांनी पहिल्यांदा तडक हुतात्मा जवान परवेझ अहमद यांचे निवासस्थान गाठले. अहमद यांच्या परिवाराचे त्यांनी सांत्वन केले. तसेच अहमद यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देणारी कागदपत्रेही तातडीने सुपूर्द केली.त्यानंतर शहा यांनी दहशतवाद्यांशी चालू असलेल्या दीर्घकाळच्या चकमकी, कट्टरतावादाचा वाढता धोका, नागरिकांची हत्या आणि सीमापार घुसखोरी मध्ये वाढ या विषयांवर उच्चस्तरीय बैठक घेतली. चर्चेतील प्रमुख मुद्दे होते. काश्मिर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भारतीय फौजा असूनही आणि स्थानिकांशी प्रेम, सौहार्दाने वागण्याच्या सरकारच्या व्यापक प्रयत्नांनंतरही खोऱ्यातील तरुणाचे कट्टरपंथीकरण आणि घरगुती दहशतवादाचे दुहेरी संकट कमी झालेले नाही यावर बैठकीत चर्चा झाली. जम्मू-काश्मिरमधील अल्पसंख्यांक आणि स्थलांतरित नागरिकांची सुरक्षा सरकारसाठी महत्त्वाची असल्याचे शहा यांनी सांगितले. वाढत्या कट्टरपंथीयांपासून असणारा धोका सर्वच सुरक्षा यंत्रणांनी बैठकीत मांडला, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या तेरा दिवसांपासून भारतीय लष्कर आणि सुरक्षा दले दहशतवाद विरोधी कारवाईत व्यस्त आहेत. यात नऊ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. लष्कर आणि पोलिस सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानी कमांडोंकडून प्रशिक्षण घेऊन आलेले दहशतवादी हिंसा घडवत आहेत.

दरम्यान तरुणाईसमोर बोलताना अमित शहा म्हणाले की, गेल्या दोन वर्षात सुरक्षा यंत्रणांवर होणारी दगडफेक जवळपास थांबली आहे. दहशतवादी हल्लेही कमी झाले आहेत. जम्मू-काश्मिरची शांतता आणि सुरक्षा धोक्यात आणणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत कडक उत्तर दिले जाईल, असेही शहा यांनी सुनावले. जम्मू-काश्मिरच्या तरुणांनी या प्रदेशाच्या विकासासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी इथला सामान्य तरुण जम्मू-काश्मिरचा मुख्यमंत्री किंवा देशाचा मंत्री होण्याची स्वप्ने पाहू शकत नव्हता. कारण त्याची मक्तेदारी काही विशिष्ट घराण्यांकडेच होती. मात्र नरेंद्र मोदी यांनी हे आता शक्य केले आहे. येथील सामान्य तरुण सुद्धा आमदार, खासदार, देशाचा, काश्मिरचा मंत्री-मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहू शकतो. पंतप्रधान मोदी लोकशाही तळागाळापर्यंत घेऊन गेले आहेत, असे शहा म्हणाले.

amit Shah landed in J&K’s Srinagar airport this morning for a three-day visit – his first since he led the government’s charge to scrap Article 370 two years ago and told that Aug 5, 2019 marked end of terror, corruption, nepotism in Kashmir valley

महत्त्वाच्या बातम्या