केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचे ऋण मानतात. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचारदौऱ्यावर असताना त्यांनी एका रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण केले. Amit Shah had a meal at the home of a rickshaw puller
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचे ऋण मानतात. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचारदौऱ्यावर असताना त्यांनी एका रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण केले.
दोमजूर मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ अमित शहांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. रोड शोपूर्वी अमित शहा यांनी एका रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण केले. यावेळी, राजीव बॅनर्जींसह अनेक पदाधिकारीही दुपारच्या जेवणाला उपस्थित होते.
पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असल्याचा पुनरुच्चा करत अमित शहा म्हणाले, ममता बॅनर्जी यांची निराशा, त्यांच्या वागण्यात, भाषणात आणि व्यवहरातही दिसून येत आहे. त्यामुळेच, भाजपाच विजय निश्चित आहे.
भाजपाचे वरिष्ठ नेते राजीव बॅनर्जी यांचा प्रचार करण्यासाठी मी आलो आहे, मला पूर्णपणे विश्वास आहे, की राजीव निवडूण येतील. 2 मे रोजी जेव्हा निकालाचे आकडे समोर येतील, तेव्हा 200 पेक्षा जास्त जागांवर भाजप विजयी ठरेल. राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App