
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉँग्रेसचे नेते शशी थरुर यांना थेट फोन कॉल करुन वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या. शशी थरुर यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. शाह यांनी स्वत: फोन करुन शुभेच्छा दिल्यामुळे ६६ वषार्चा होण्यामागे काहीतरी विषेश असावे असे म्हटले आहे.Amit Shah called and wished Shashi Tharoor a happy birthday
थरुर म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांनी फोन कॉल केल्यामुळे मी आश्चर्यचकित झालो. त्यांनी फोन करुन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ६६ वर्षांचा होण्यामागे काहीतरी विशेष असावं. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे खूप भारावलो. खूप खूप आभार.
शशी थरुर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जातात. देशातील विविध प्रश्नावर त्यांनी मांडलेल्या मताला विशेष महत्त्व असते. काँग्रेस पक्षामध्येदेखील त्यांचे विशेष स्थान आहे. विरोधी पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे वेगवेगळ्या स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.