Oxygen tanker missing in Haryana : अवघा देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष करत आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी औषधे, ऑक्सिजनची टंचाई जाणवू लागली आहे. केंद्राने यावर विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवठ्याची रूपरेखा आखली आहे. सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी वायुसेना, रेल्वेचीही मदत घेतली जात आहे. अशा अत्यंत निकडीच्या बनलेल्या ऑक्सिजनचीच चोरी झाली तर… होय, अशी घटना घडली आहे. हरियाणाला जाणारा ऑक्सिजनचा टँकरच बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपासही सुरू केला आहे. Amid oxygen Shortage, now Oxygen tanker missing in Haryana, police Started investigating After FIR
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अवघा देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष करत आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी औषधे, ऑक्सिजनची टंचाई जाणवू लागली आहे. केंद्राने यावर विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवठ्याची रूपरेखा आखली आहे. सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी वायुसेना, रेल्वेचीही मदत घेतली जात आहे. अशा अत्यंत निकडीच्या बनलेल्या ऑक्सिजनचीच चोरी झाली तर… होय, अशी घटना घडली आहे. हरियाणाला जाणारा ऑक्सिजनचा टँकरच बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपासही सुरू केला आहे.
लिक्विड ऑक्सिजन वाहून नेणारा टँकर बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा टँकर हरियाणाच्या पानिपत येथून सिरसाकडे जात होता. टँकर गायब झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून टँकरचा शोध घेण्यात येत आहे. पानिपत पोलिसांनी सांगितले की, जिल्हा औषध नियंत्रकाच्या तक्रारीवरून शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी पानिपत प्लांटमधून द्रवरूप ऑक्सिजन भरल्यानंतर टँकर सिरसा येथे रवाना करण्यात आले, परंतु ते तेथे पोहोचले नाहीत. ही माहिती पानीपतचे मतलोडा स्टेशन हाऊसचे ऑफिसर (एसएचओ) मनजित सिंग यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे, वैद्यकीय ऑक्सिजनची मोठी मागणी आहे. अनेक रुग्णालयांमध्ये अत्यल्प प्रमाणात ऑक्सिजन उरला आहे.
यापूर्वी, हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी बुधवारी आरोप केला की, पानिपतहून फरिदाबादकडे जाणारा कोविड रुग्णांसाठी पाठवण्यात आलेला मेडिकल ऑक्सिजनचा टँकर दिल्ली सरकारने लुटला. हा टँकर दिल्ली सरकारच्या हद्दीतून जात असताना लुटण्याचा आल्याचा आरोप वीज यांनी केलाय.
Amid oxygen Shortage, now Oxygen tanker missing in Haryana, police Started investigating After FIR
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App