विशेष प्रतिनिधी
अमेठी : अमेठीसोबत कौटुंबिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्यांनी यापूर्वी या लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचे मुद्दे कधीच संसदेत उपस्थित केले नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहूल गांधी यांच्यावर केली.Amethi development issues never come up in Parliament, Smriti Irani criticizes Rahul Gandhi
इराणी म्हणाले, मागील काही वर्षांपासून अमेठीत कित्येक समस्या होत्या. मात्र, पूर्वी या मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारांनी हे मुद्दे संसदेत उपस्थित केले नव्हते. अमेठीसोबत कौटुंबिक संबंध असल्याचा दावा करणारे येथील विकासकामांबद्दल कायम मौन धारण करायचे. त्यामुळे अमेठी लोकसभा मतदारसंघ कित्येक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिले.
उत्तरप्रदेशातील योगी सरकारमुळे तिलोई येथील बसस्थानक केवळ नऊ महिन्यांच्या कालावधीत तयार झाले. तिलोई येथे वैद्यकीय महाविद्यालय बांधले जात असल्याचा मला आनंद असून, येथे प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आला आहे, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App