वृत्तसंस्था
पाटणा : बिहारमध्ये कोरोनारुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसताना आता त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू झाले आहे. राजकीय नेत्यांचा आरोप प्रत्यारोपांचा खेळही सुरु झाला आहे. भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या निधीतून खरेदी केलेल्या ४० रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याचे माजी खासदार पप्पू यादव उघडकीस आणले आहे. रुडी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या छपरामधील अमनौर येथील शेतात या रुग्णवाहिका ठेवल्या आहेत. Ambulance issue erupts in Bihar politics
रुग्णवाहिकेवरून राजकारण केले जात असल्याचा आरोप यांनी पप्पू यादव यांच्यावर केला आहे. कोरोनाच्या साथीमुळे रुग्णवाहिकेच्या चालकांनी नोकरी सोडली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कळविले होते व चालकांची व्यवस्था करून रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यास सांगितले होते, असा दावा रुडी यांनी केला आहे.
पाटण्यात आज पप्पू यादव यांनी निवासस्थानी ४० परवान्यांसह ४० चालकांना उपस्थित करून ते सर्वजण रुग्णवाहिका चालविण्यास तयार असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App